Advertisement

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाइल आणण्यास बंदी घालावी, पालक संघटनांची मागणी

शालेय विद्यार्थ्याकडून व्हॉट्सअप आणि चॅटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांशी करत असलेले गैरवर्तनाचे अनेक प्रकार समोर आले आहेत.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाइल आणण्यास बंदी घालावी, पालक संघटनांची मागणी
SHARES

राज्यांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाइल आणण्यास बंदी घालावी, अशी मागणी  इंडिया वाइड पॅरेंट्स असोसिएशन या पालक संघटनेने राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग आणि राष्ट्रीय महिला व बाल विकास आयोगाकडे केली आहे. मोबाइलवर बंदी घालून त्याची नियमावली अधिक कडक करावी व त्याची अंमलबजावणी तत्काळ करावी, अशी मागणी पालक संघटनेने पत्र लिहून केली आहे. 

शालेय विद्यार्थ्याकडून व्हॉट्सअप आणि चॅटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांशी करत असलेले गैरवर्तनाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. नुकतंच मुंबईत एका आंतरराष्ट्रीय शाळेने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आपल्या वर्गमित्रांवर हिंसक आणि लैंगिक टीका करणाºया १३ ते १४ वयोगटांतील ८ विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. वर्गातील दोन मुलींच्या पालकांनी ग्रुपवरचे मेसेज वाचले आणि शाळेकडे याबद्दल तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मोबाइलप्रमाणेच विद्यार्थ्यांना सोशल मीडियाला एक्सेस देणाऱ्या इतर गॅजेट्सवरही बंदी आणण्याची मागणीही पालकांनी केली आहे.

मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना सामान्य ज्ञान मिळावे यासाठी अनेक पालक मुलांना मोबाइल देतात. मात्र, विद्यार्थी मोबाइलचा गैरवापर करत असल्याचं दिसून येत आहे. शाळेत तास सुरू असताना मोबाइलवर गेम्स खेळत बसणे, शाळा चालू असताना मित्रांशी विनाकारण गप्पा मारणे, वर्गात शिक्षक नसताना मोबाइलचा आवाज करणे असे प्रकार सुरू आहेत. काही विद्यार्थी विद्यार्थिनीसोबत अश्लील चॅटिंग करत असल्याचंही समोर आलं आहे.हेही वाचा -

दरवर्षी घटतेय महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या, निधी वाढवूनही उपयोग नाहीच

CBSE परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा