Advertisement

दरवर्षी घटतेय महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या, निधी वाढवूनही उपयोग नाहीच

महापालिकेच्या शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता खालावत असल्यानेच पालक आपल्या मुलांना या शाळांमध्ये दाखल करण्यास तयार नाही, असंही ‘प्रजा’ने आपल्या अहवालात नमूद केलं आहे.

दरवर्षी घटतेय महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या, निधी वाढवूनही उपयोग नाहीच
SHARES

बृहन्मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक अर्थसंकल्पात वाढ होऊनही मराठी शाळांचा टक्का सातत्याने घसरत असल्याचा अहवाल नुकताच प्रजा फाऊंडेशनने सादर केला आहे. महापालिकेच्या शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता खालावत असल्यानेच पालक आपल्या मुलांना या शाळांमध्ये दाखल करण्यास तयार नाही, असंही ‘प्रजा’ने आपल्या अहवालात नमूद केलं आहे.  

हेही वाचा- शाळेतील विद्यार्थ्यांना घंटा वाजवून पाणी पिण्याची आठवण

‘प्रजा’ फाऊंडेशनने मंगळवारी ‘महापालिका शाळांतील शिक्षण’ हा अहवाल सादर केला. या अहवालानुसार गेल्या ५ वर्षांमध्ये (२०१४-१५ ते २०१८-१९) मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या ९६ हजार ३३९ ने (२४ टक्के) कमी झाली आहे. २०१४ साली महापालिकेच्या शाळेत ३ लाख ९२ हजार ०८ विद्यार्थी शिकत होते. ही संख्या १० टक्क्यांनी घसरून २०१८-१९ मध्ये एकूण २ लाख ९५ हजार ०५८ विद्यार्थ्यांवर आली.
मुंबई महापालिकेच्या १ हजार १८६ शाळा असून त्यापैकी केवळ ४१८ शाळांची पटसंख्या १०० विद्यार्थ्यांपर्यंत आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी टिकून राहण्याचं प्रमाण अवघं २२ टक्के आहे. खासकरून सातवी-आठवीत विद्यार्थी गळतीचं प्रमाण सर्वाधिक आहे. 

हेही वाचा- १० वी व १२ वीच्या गुणपत्रिकेवर 'असा' शेरा देण्यात येणार

महापालिकेने शिक्षणावरील खर्च दुपटीने वाढवूनही काही उपयोग होत नसल्याचं मत फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी नोंदवलं आहे. २००८-०९ मध्ये शैक्षणिक अर्थसंकल्पाची टक्केवारी ५.४ वरून २०१९-२० मध्ये ९.५ टक्क्यांवर आली आहे. २०१४-१५ मध्ये महापालिका विद्यार्थ्यामागे ५० हजार ५८६ रुपये खर्च करत होती. हा खर्च २०१८-१९ मध्ये प्रति विद्यार्थी ६० हजार ८७८ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. 

परंतु शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जामुळे पालक आपल्या पाल्याला महापालिका शाळेत दाखल करण्यास तयार नसल्याचं दिसून येत आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा