उसने पैसे देण्यास नकार दिल्यानं वेश्येची हत्या

मीना नावाच्या महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांच्या यश आलं आहे. या हत्येप्रकरणी काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी एका ६० वर्षाच्या एजंटला अटक केली होती. पण आता या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या शोभाबाई पाटील उर्फ नेहाने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली आहे.

उसने पैसे देण्यास नकार दिल्यानं वेश्येची हत्या
SHARES

उसने पैसे देण्यास नकार दिल्याने वेश्या व्यवसाय करणाऱ्या मीना नावाच्या महिलेची हत्या करणाऱ्या आरोपी महिलेला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या हत्येप्रकरणी काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी एका ६० वर्षाच्या एजंटला अटक केली होती. पण आता या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या शोभाबाई पाटील उर्फ नेहाने पोलिसांसमोर हत्येची कबुली  दिली आहे.


संपूर्ण प्रकार

दादर परिसरात मिनासोबत 48 वर्षीय शोभा ही वेश्या व्यवसाय करायची. तर आरोपी बाबु पटेल हा वेशा व्यवसायात एजंटचं काम करतो. शोभा ही पतीच्या निधनानंतर बाबूसोबत २००८ पासून रहात आहे. काही दिवसांपूर्वी मिना ही नवी मुंबईत येथील शोभाच्या घरी रहायला आली होती. त्यावेळी मिनाकडे ४० हजार रुपये होते. हे पैसे तिला बँकेत ठेवायचे होते. मात्र बँकेत खाते उघडण्यासाठी लाईट बिल गरजेचं असतं. हे लाईट बिल मिळवण्यासाठीच मिना शोभाकडे म्हणजेच नवी मुंबईच्या करावेगाव येथे आली होती.

तेव्हा वीज बिलाची प्रत देण्याच्या नावाखाली शोभाने तिला ४ दिवस ठेवून घेतलं. ऐवढी मोठी रक्कम पाहून शोभाच्या मनात लालसा निर्माण झाली होती. त्यामुळे शोभाने मिनाकडे उसने पैसे म्हणून ४० हजार रुपये रक्कम मागितले. मात्र मिनाने ते पैसे देण्यास नकार दिला.


आणि हत्येचा कट रचला!

पैसे देण्यास मिना वारंवार नकार देत होती. ते पैसे मिळवण्यासाठी शोभाने रात्री झोपताना मीनाचा काटा काढण्याचा विचार केला. त्यानुसार पहाटे ४ वा. शोभाने बाबुला उठवून काही मिनिटात मिनाच्या हत्येचा कटर रचला. त्यानुसार बाबूने टॉवेलच्या माध्यमाधून मिनाचा गळा आवळला, तर शोभाने मिनाचे हात पकडून ठेवले होते. त्यानंतर तिचा मृतदेह किचनच्या कोपऱ्यात नेऊन एका पोत्यात भरला आणि ते पोतं एका ड्रममध्ये टाकलं. पुढे त्यांनी ट्रान्सपोर्टवाल्याला तो ड्रम वाशीच्या एपीएमसी मार्केटमधील शिवाजीनगर परिसरात इमारत क्र १ येथे सोडण्यास सांगितलं. त्यासाठी त्याला 600 रुपयेही दिले. त्यानंतर त्यांनी मिनाचे पैसे वाटून घेतल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.


हेही वाचा -

हत्या करून मृतदेह टाकला ड्रममध्ये, आरोपीला पोलिसांनी केली अटक

 पैशाच्या वादातून वेश्येची हत्या, १२ तासांत आरोपी जेरबंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा