Advertisement

हत्या करून मृतदेह टाकला ड्रममध्ये, आरोपीला पोलिसांनी केली अटक


हत्या करून मृतदेह टाकला ड्रममध्ये, आरोपीला पोलिसांनी केली अटक
SHARES
Advertisement

शिवाजी नगर परिसरात नटवर पारेख कंपाऊंडमध्ये नुकतीच महिलेची हत्या करून तिचा मृतदेह ड्रममध्ये टाकून मारेकऱ्यांनी पळ काढला होता. या हत्येचा उलघडा करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी नेरूळच्या एका इस्टेट एजंटला अटक केली आहे.


पैशांच्या तगाद्यामुळे केली हत्या

नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात इस्टेट एजंटचे काम करणाऱ्या आरोपी बाबू भगवान पटेल (६०) याचे मृत मिना हिच्याशी अनैतिक संबध होते. त्यातूनच मिना त्याच्यामागे पैशासाठी वारंवार तगादा लावायची. यावरून नुकतेच दोघांमध्ये भांडण झाले होते. यातून बाबूने तिचा काटा करण्याचा कट रचला. त्यानुसार मिनाला घरी पैसे देण्यासाठी बोलावून बाबूने पत्नीच्या मदतीने मिनाची हत्या करून तिचा मृतदेह एका ड्रममध्ये टाकला.


वाशी मार्केटमध्ये सोडला मृतदेह

या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने वाशीच्या एपीएमसी मार्केटमधील एका ट्रान्स्पोर्टवाल्याला ६०० रुपये देऊन हा ड्रम देवनारला सोडायला सांगितले. त्यानुसार ट्रान्सपोर्टवाल्याने ड्रम सोडला. मात्र, ड्रममधून येणाऱ्या उग्र वासाने हा हत्येचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत पोलिस उपायुक्त शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.


सीसीटीव्हीने लावला गुन्ह्याचा छडा

त्यानुसार पोलिसांनी परिसरातील तब्बल ३०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी त्या टेम्पो चालकाचा पोलिसांना शोध लागला. त्या टेम्पो चालकाच्या चौकशीतून पटेलची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. ही हत्या पटेलने का केली? हे अद्याप समजू शकले नसून पैशांच्या व्यवहारातूनच ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे.हेही वाचा

'ओएलएक्स'वरून गाडी विकताना सावधान!


संबंधित विषय
Advertisement