'ओएलएक्स'वरून गाडी विकताना सावधान!


'ओएलएक्स'वरून गाडी विकताना सावधान!
SHARES

चारचाकी, दुचाकी किंवा कुठलीही जुनी गाडी विकायची किंवा विकत घ्यायची असेल तर ओएलएक्स या संकेतस्थळाचा वापर केला जातो. मात्र, मुंबईतल्या एका नागरिकाची या संकेतस्थळामार्फत चारचाकी विकताना फसवणूक झाली अाहे. गाडीची विक्री करताना बँकेत पैसे पाठवल्याचा मेसेज दाखवून गाडी घेऊन पळालेल्या सराईत आरोपीला बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीवर मुंबईसह राज्यातील विविध पोलिस ठाण्यात अशाप्रकारच्या फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल आहेत. अारोपीकडून बीएमडबल्यू, इनोव्हा, वेन्टो, वॅगेन अार, अशा सात गाड्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. 



एनईएफटीद्वारे पैसे केले ट्रान्सफर

वांद्रेच्या बीकेसी पोलीस ठाणे परिसरात राहणारे खालिद अहमद शेख यांनी एप्रिल महिन्यात अापल्या होंडा सिव्हिक गाडीची माहिती 'ओएलएक्स' या संकेतस्थऴावर अपलोड केली. ही माहिती पाहून आरोपी अय्याज सैय्यद यानं शेख यांच्याशी संपर्क साधला. गाडी पाहून दोघांमध्ये १ लाख ४० हजार रुपयांचा व्यवहार झाला. त्यानुसार सैय्यदनं एनईएफटीद्वारे पैसे खात्यावर पाठवल्याचा मॅसेज शेख यांना दाखवला. त्यावर विश्वास ठेवून शेख यांनी सैय्यदला गाडीची कागदपत्रं अाणि चावी दिली.


अाणि शेख यांना धक्का बसला!

दुसऱ्या दिवशी शेख यांनी बँकेत चौकशी केली असता, एनईएफटीद्वारे कोणतेही पैसे सैय्यदच्या खात्यातून आले नसल्याचे एेकून शेख यांना धक्काच बसला. सैय्यद यांचा फोन लावला असता, फोन लागत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. सैय्यदनं सर्व माहिती खोटी दिल्यानं पोलिसांच्या हाती काही लागत नव्हतं. अखेर तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी २० मे रोजी सैय्यदला अटक केली. सैय्यदच्या चौकशीतून पोलिसांनी त्यानं अशाप्रकारे ७ गाड्या लुटल्याची कबुली दिली आहे.


हेही वाचा -

दिलीप कुमारांचं घर बळकावू पाहणाऱ्या बिल्डराचा जामीन अर्ज फेटाळला

धक्कादायक! आयफोनचा डेटाही गेला चोरीला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा