मुंबईत बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट


मुंबईत बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट
SHARES

मुंबईच्या झोपडपट्टी परिसरात डाॅक्टर असल्याचे सांगून दवाखाना उघडत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ५ बोगस डाॅक्टरांना गुन्हे शाखा ३ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मागील १० वर्षापासून हे बोगस डाॅक्टर दवाखाना चालवत असून अटक केलेल्या आरोपींमधील एक जण तर अशिक्षित आहे तर बाकी ७ वी ते १२ वी पर्यंत शिकलेले आहेत. 

मुंबईच्या नागपाडा ,भोईवाडा, करीरोड परिसरातील दुर्गम भागात आरोपी बोगस डाॅक्टर समशेर कदिर शेख, अन्वर हुसेन, नईम शेख, नवाब हुसैन, रिझवानुद्दीन बंजारा यांनी आपली दुकान थाटली होती. मागील दहा वर्षांपासून नागरिकांना आयुर्वेदिक औषध देऊन हे पाच बोगस डॉक्टर नागरिकांची फसवणूक करत होते. याबाबतची माहिती गुन्हे शाखा ३ चे नितीन पाटील यांना मिळाली.  त्यानुसार पोलिसांनी त्या बोगस डाॅक्टरांवर कारवाई केली.  पोलिस चौकशीत  यातील एक जण तर अशिक्षित आहे तर बाकी ७ वी ते १२वी पर्यंत शिकलेले आहेत.

अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांकडे मेडिकल असोसिएशनचे प्रमाणपत्र आहे. पण ते प्रमाणापत्र दुसऱ्याच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे. . पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार अद्याप पोलिसांपर्यंत आलेली नाही. अगदी सध्या आजारापासून ते लैगिंक समस्या निवारण करत असल्याचं समोर आलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय