SHARE

नायगाव येथील सशस्त्र पोलीस दलातील पाच पोलिसांच्या निलंबनाने संपूर्ण पोलीस खात्यात चर्चेला उधाण आलं आहे.. या प्रकरणात सह पोलीस निरीक्षकापासून ते शिपायापर्यंत समावेश आहे...या सगळ्यांनी आर्थिक लाभासाठी स्वतःची आणि कुटुंबीयांची बनावट वैद्यकीय बिल, केस पेपर्स सादर करून शासनाकडून हजारो रुपये उकलण्याचा प्रयत्न केला,मात्र पडताळणीत या सगळ्यांचं बिंग फुटलं आणि या पोलिसांचं निलंबन करण्यात आलं. सशस्त्र पोलीस दल, नायगाव इथं कार्यरत असलेल्या सह पोलीस निरीक्षक कल्पना सावंत यांनी ८० हजार ९०२ रुपयांचं जे. जे. रुग्णालयाचं बनावट बिल सादर केलं, मात्र तपासणीत ही सगळी कागदपत्रे बनावट असल्याचं समोर आलं. तसंच पोलीस उप.निरीक्षक अब्बास शेख यांनी तर आपल्या आईच्या आजारपणाची तब्बल १ लाख ६९ हजारांची बनावटी बिलं सादर केली होती..मात्र त्यांनी सादर केली कागदपत्र बनावटी तर निघालीच पण ज्या डॉक्टरांचा या कागदपत्रात उल्लेख करण्यात आला होता..त्या नावाचे डॉक्टरचं रुग्णालयात नसल्याचं समोर आलं.. हवालदार गुलामहुसेन शेख,शिपाई विद्या राजपूत तसंच शिपाई नंदा कुंजरंगे यांनीही सादर केलेले वैद्यकीय बिल अवैध्य असल्याचं समोर येताच या सगळ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली..एकीकडे पोलीस देशाचं रक्षण करतात मात्र दुसरीकडे हेच पोलीस स्वत:च्या फायद्यासाठी बनावटी कागदपत्रे, बिल सादर करुन लाखो रुपये आपल्या खिशात घालतात..मात्र या पाच पोलिसांच्या निलंबनाने संपू्र्ण पोलीस खात्याच्या नावावर एकप्रकारे काळीमा फासला आहे.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या