अमरनाथ यात्रेला जाताय? मग तुमचीही अशीच फसवणूक होऊ शकते!

Kandiwali
अमरनाथ यात्रेला जाताय? मग तुमचीही अशीच फसवणूक होऊ शकते!
अमरनाथ यात्रेला जाताय? मग तुमचीही अशीच फसवणूक होऊ शकते!
अमरनाथ यात्रेला जाताय? मग तुमचीही अशीच फसवणूक होऊ शकते!
See all
मुंबई  -  

यंदा 29 जून पासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. तुम्हीही जर अमरनाथ यात्रेला जाणार असाल आणि कुठल्याही खासगी टुर्स अँड ट्रॅव्हल कंपनीकडून तिकीट बुक केले असेल तर, जरा सांभाळून. कारण तुमची सहज फसवणूक होऊ शकते!

अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या 50 यात्रेकरुंची फसवणूक करणाऱ्या एका खासगी टुर्स अँड ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाला चारकोप पोलिसांनी अटक करत कोर्टात हजर केले. तेथे त्याला 29 जूनपर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.अशी झाली फसवणूक

मुंबईतून यात्रेकरुंचा एक गट अमरनाथ यात्रेसाठी जाणार होता. यामध्ये 50 जणांचा समावेश होता. त्यासाठी यांनी मालाडच्या मार्वे रोड येथील 'दिव्या टुर्स सुरती हाऊस' या टुर्स अँड ट्रॅव्हल कंपनीकडून तिकीट बुक केले. तेव्हा टुर्स अँड ट्रॅव्हलच्या कंपनी मालक भुपेश सुरती याने यात्रेकरुंना 'तुम्ही 26 जूनला यात्रा करू शकता', अशी हमी दिली. 25 जून रोजी त्याने सर्व यात्रेकरुंना आपल्या घरी बोलावले आणि 26 जूनचे तिकीट मिळाले नसल्याचे सांगितले. 

त्यानंतर '29 जूनचे तिकीट कन्फर्म होईल' असे त्याने यात्रेकरुंना सांगितले. त्यानंतर यात्रेकरुंनी पुन्हा सुरतीला तिकिटाबद्दल विचारले. पण तो काही ना काही सांगून यावर बोलणे टाळत होता. त्यावरुन आपली फसवणूक झाल्याचे यात्रेकरुंना कळल्यानंतर त्यांनी चारकोप पोलिसांकडे तक्रार नोंदवली. 

पोलिसांनी त्याच्याविरोधात 406 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आणि बोरिवली कोर्टात हजर केले असता जिथे त्याला 29 जूनपर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली. आतापर्यंत फसवणूक झालेल्या 52 जणांचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.