चारकोपमध्ये बोगस प्रमाणपत्र देणारा प्राचार्य अटकेत

  CHARKOP
  चारकोपमध्ये बोगस प्रमाणपत्र देणारा प्राचार्य अटकेत
  मुंबई  -  

  मुंबईच्या चारकोप पोलिसांनी एका कॉलेजच्या प्राचार्यांना त्यांनीच केलेल्या तक्रारीमध्ये अटक केल्याने खळबळ उडाली आहे. प्रशांत गायकवाड असं त्यांचं असून ते कांदिवली येथील राम पंडागळे एज्युकेशन ट्रस्ट चालवत असलेल्या कॉलेजचे प्राचार्य आहेत. रविवारी चारकोप पोलिस ठाण्यात कॉलेजच्या जवळ असलेल्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात असल्याचा आरोप त्यांनी क्लासवर लावला होता.

  या प्रकरणी चारकोप पोलिसांनी मकरंद क्लासेसचे मकरंद बोडसे यांना अटकही केली होती. मात्र तपासात जे काही समोर आलं त्यानंतर पोलिसांनी चक्क तक्रार करणाऱ्या प्राचार्यांनाच अटक केली. सांगितलं जातंय की, या कॉलेजमध्ये 11 वीला सायन्स विभागात एकूण 390 विद्यार्थी शिकत होते. मात्र यातील 76 विद्यार्थी कधी लेक्चर तसेच परीक्षेला आले देखील नाहीत. वर्ष संपताना या 76 विद्यार्थ्यांना नापास करण्याची नामुष्की कॉलेजवर आली.

  विद्यार्थ्यांचं हित बघता आणि पालकांच्या दबावाने प्राचार्य प्रशांत गायकवाड यांनी स्वतः या मुलांना प्रशस्तीपत्रक दिल्याचं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रारदार प्रशांत गायकवाड यांना त्यांच्याच फिर्यादीत अटक केली. त्यांना फसवणूक, कट रचणे तसेच महाराष्ट्र शिक्षण कायद्यांतर्गत अटक केली आहे. सोमवारी त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.