ताडदेवमध्ये ५० लाखांची रोकड हस्तगत

मुंबईत शिवडी, माहिम पाठोपाठ आता ताडदेव परिसरातही पोलिसांनी ५० लाखांची रोकड हस्तगत केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

ताडदेवमध्ये ५० लाखांची रोकड हस्तगत
SHARES

मुंबईत शिवडी, माहिम पाठोपाठ आता ताडदेव परिसरातही पोलिसांनी ५० लाखांची रोकड हस्तगत केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. ताडदेव परिसरात शनिवारी पोलिसांनी ही रोकड हस्तगत केली असून, हे पैसे कुणाचे आहेत, कशासाठी वापरले जाणार होते, याबाबत आयकर विभाग चौकशी करत आहे. 


५० लाखांची रोकड

मुंबईतील ताडदेव येथील आग्यारी परिसरात निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिसांनी फिरता पहारा ठेवला होता. त्यावेळी आग्यारीजवळ पोलिस बंदोबस्त असताना एका कारमध्ये पोलिसांना ही ५० लाखांची रोकड मिळाली. 


कार हस्तगत

प्रशांत रमेशचंद्र समदानी यांच्याकडं हे पैसे मिळाले असून, या प्रकरणी पोलिसांनी त्यांची कार ही हस्तगत केली आहे. हे पैसे कुणासाठी आणि कशासाठी वापरले जाणार आहे. याच्या चौकशीसाठी पोलिसांनी आयकर विभागाला मदत करत असल्याची माहिती, दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.



हेही वाचा -

'राज ठाकरेंनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच' – उर्मिला मातोंडकर

धारावीत इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू, ३ जण जखमी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा