ईस्टर्न फ्री-वेवर टॅक्सीचा अपघात, 6 जणांचा मृत्यू

वाडीबंदर - शनिवारी सकाळी मुंबईच्या वाडीबंदर परिसरात भीषण अपघात झाला असून त्यात सहा ते सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचं समजतंय. सकाळी 9 च्या सुमारास टॅक्सी फ्री-वे वरून भरधाव वेगाने आली. फ्री- वे उतरताच चालकाचा टॅक्सीवरील ताबा सूटला आणि ती थेट डिवाइडरला जाऊन आदळली. अपघात एवढा भीषण होता की त्यात टॅक्सीचे परखच्चे उडाले. टॅक्सीत ओव्हरलोड असल्याकारणानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. टॅक्सीत तब्बल 9 प्रवासी असून, त्यातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहीती मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिलीये.

Loading Comments