इमारत कोसळून सहा ठार

  बेहरामपाडा - वांद्रे पूर्व येथील बेहरामपाड्यातील एसआरडी इमारतीचा एक भाग कोसळून गुरुवारी झालेल्या दुर्घटनेत सहा जण ठार झाले. तर पाच जण जखमी झाले. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

या दुर्घटनेत ठार झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे

  • आयेशा अकबर खान (12)
  • अली निसार अहमद खान (3)
  • ओसामा निसार खान (14)
  • अफिफा सादाब (1 )
  • अरिबी सदर निसार खान (2)
  • निसार अहमद खान (16)
Loading Comments