कुर्ल्यात ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

आरोपीचे कुर्ला पश्चिमेमधील विजय महल चाळीजवळ दुकान आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दुकानाबाहेर खेळणाऱ्या या मुलीला चॉकलेट देतो असे सांगून त्यानं दुकानात बोलावले.

SHARE

हैदराबादमध्ये डाॅक्टर तरूणीवर बलात्कार करून तिला जाळून टाकण्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेने देशभरात संताप व्यक्त केला जात असतानाच एका नराधमाने ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील कुर्लामध्ये ही घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

आरोपीचे कुर्ला पश्चिमेमधील विजय महल चाळीजवळ दुकान आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दुकानाबाहेर खेळणाऱ्या या मुलीला चॉकलेट देतो असे सांगून त्यानं दुकानात बोलावले आणि लैंगिक अत्याचार केले. घरी गेल्यावर तिने वेदना होत असल्याचं आईला सांगितलं. त्यानंतर आईने तिला डाॅक्टरकडे नेले. यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. दुकानदाराबाबत मुलीने सांगताच तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली.  विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. हेही वाचा  -

राणी बागेत वाघ, सिंह, तरस, अस्वलाचं होणार दर्शन

महिला पोलिसावर रेल्वे प्रवाशांचा हल्ला
संबंधित विषय
ताज्या बातम्या