Advertisement

राणी बागेत वाघ, सिंह, तरस, अस्वलाचं होणार दर्शन

राणी बागेत गेली दोन वर्षांहून अधिक काळ नुतनीकरणाचं काम सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे.

राणी बागेत वाघ, सिंह, तरस, अस्वलाचं होणार दर्शन
SHARES

फारसे प्राणी नसल्यामुळे नागरिकांची गर्दी कमी होऊन सुनीसुनी वाटणारी राणीची बाग (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय) आता पुन्हा गजबजणार आहे. मुंबई महापालिका (बीएमसी) प्रशासनाकडून राणी बागेचा कायापालट करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.  देश – विदेशातून अनेक प्राणी, पक्षी राणी बागेत लवकरच दाखल होणार आहेत. 

राणी बागेत गेली दोन वर्षांहून अधिक काळ नुतनीकरणाचं काम सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे.  येत्या मार्चअखेरपर्यंत मुंबईकरांना नवीन राणी बागेचं दर्शन होणार आहे. वाघ, सिंह, तरस, अस्वल हे प्राणी पर्यटकांना पहायला मिळतील. या प्राण्यांसाठी  आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून अद्ययावत पिंजरे बनवण्याचं काम सुरू आहे. वाघांसाठी रणथंबोरच्या किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तर सिंहासाठी गीरच्या जंगलातील कु टीप्रमाणे दिसणारा पिंजरा उभारला आहे. 

आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून उभारण्यात आलेल्या या ‘वायर-रोप’ पिंजऱ्यातून नागरिकांना बिबटय़ाच्या हालचाली जवळून टिपता येणार आहेत. मगर आणि सुसर यांसाठी बंदिस्त तळे बांधण्यात येणार आहे. यामध्ये पाण्यात पोहणाऱ्या मगरींचे दर्शन पर्यटकांना होणार आहे. प्रत्येक प्राण्याला बसण्यासाठी खास मचाण, पोहण्यासाठी छोटे तळेही असणार आहे.  मुक्त संचारत असलेल्या या प्राण्यामध्ये आणि नागरिकांमध्ये एक काचेचे आवरण असेल. ज्यामुळे प्राण्यांना जंगलात जाऊन पाहिल्याचा अनुभव पर्यटकांना घेता येईल. राणी बागेचा कायापालट करण्यासाठी पालिकेने ११० कोटी रुपये खर्च केले आहेत. हेही वाचा - 

मध्य रेल्वेवर १४ डिसेंबरपासून नवे वेळापत्रक

मुंबईतील दुकानं, हॉटेल्स रात्रभर सुरू ठेवण्याची काँग्रेसची मागणी
संबंधित विषय