महिला पोलिसावर रेल्वे प्रवाशांचा हल्ला

रेल्वे स्थानकांवरील महिला पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

महिला पोलिसावर रेल्वे प्रवाशांचा हल्ला
SHARES

रेल्वे स्थानकांवरील महिला पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. महिला पोलीस आपलं काम करत असताना त्यांच्यावर हात उचलल्याची घटना मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर घडली आहे. शिफा सय्यद असं या महिला पोलिसाचं नाव असून, या प्रकरणी पोलीसांनी आरोपींवर कुर्ला रेल्वे पोसील ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

महिला पोलिसांवर हल्ला

रात्री उशिरा रेल्वे स्थानकावर बसलेल्या जोडप्याला हटकल्यानं त्यातील तरुणीनं थेट महिला पोलिसांवरच हात उचलला. शिफा यांची रात्री १० ते सकाळी ६ अशी नाइट ड्युटी घाटकोपर स्थानकावर होती. रविवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आरोपी राम पवार आणि आरोपी अनुराधा धनाडे बसले होते. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर संशयास्पद हालचाली करत असताना शिफा या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना हटकलं.

उद्धट उत्तरं देत शिवीगाळ

शिफा यांनी त्या दोघांची चौकशी केली असता, त्यावेळी जोडप्यातील महिलेनं शिफाला उद्धट उत्तरं देत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा न करत शांतपणे सभ्य भाषेत बोलण्यास शिफा यांनी सांगितलं. परंतु, विचारपूस केल्याच्या रागात आरोपींनं शिफाची कॉलर पकडून तिला मारहाण करत नखांनी ओरबाडण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळते.

हाताला मुकामार

ही घटना घडताच स्थानकातील होमगार्डनी शिफाच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर होमगार्डच्या मदतीनं शिफा यांनी दोघा आरोपींना पकडलं. तसंच, घाटकोपर रेल्वे पोलिस ठाण्यात नेलं. घाटकोपर स्थानकात झालेल्या मारहाणीत शिफा यांच्या हाताला मुकामार लागला असून, त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणांमुळे रेल्वे पोलिस दलातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.



हेही वाचा -

राज्यात शासकीय काम आता मराठी भाषेतच

आता 'इतक्या' दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट, 'ट्राय'चा नवा नियम



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा