भांडुपमध्ये वृद्धाची आत्महत्या


भांडुपमध्ये वृद्धाची आत्महत्या
SHARES

खिंडीपाडा - भांडुपमध्ये राहणाऱ्या ६० वर्षीय अशोक आरवी यांनी राहत्या घरात गळफास लावून घेतला. बुधवारी दुपारी ही घटना घडली. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची नोंद करून भांडुप पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
भांडुप पश्चिमेकडील खिंडीपाडा परिसरात आरवी पत्नीसोबत राहत होते. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घरात एकटेच असताना त्यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. शेजारी राहत असलेल्या एका रहिवाशाने आरवी यांना हाक मारली असता, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानं घरात डोकावून पाहिलं असता आरवी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला दिसले. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या भांडुप पोलिसांनी आरवी यांना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा