60 वर्षांचा तोतया 'टीसी' गजाआड

  Andheri
  60 वर्षांचा तोतया 'टीसी' गजाआड
  मुंबई  -  

  विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पैसे लुटणाऱ्या 60 वर्षांच्या तोतया तिकीट तपासणीसाला (टीसी) अंधेरी रेल्वे पोलिसांनी गजाआड केले आहे. रवींद्र नेटबजी असे त्याचे नाव आहे. आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 28 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

  अंधेरी जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले की, मागच्या काही दिवसांपासून एक तोतया 'टीसी' कुठल्याही नियमांचा धाक दाखवून रेल्वे प्रवाशांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी मिळत होत्या. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून रवींद्र नेटबजीवर नजर ठेवली. तेव्हा हा तोतया 'टीसी' प्रवाशांकडून दंडाच्या नावाखाली 500 आणि 1000 रुपये वसूल करत असल्याचे दिसले. पोलिसांनी आरोपीला त्वरीत रंगेहात पकडून गजाआड केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.