महाराष्ट्राच्या वेशीवर मुंबईत येणारा ६५० किलोचा गांजा पकडला, तिघांना अटक

आरोपींनी हे अंमली पदार्थ ओडिसा व त्यानंतर नागपूर येथून या ट्रकला एस्कॉर्ट करत आणले होते.

महाराष्ट्राच्या वेशीवर मुंबईत येणारा ६५० किलोचा गांजा पकडला, तिघांना अटक
SHARES

मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी दिवसरात्र झटत असताना. याच संधीचा फायदा घेऊन काही तस्कर मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. नुकतेच मुंबईत येणारा साडे सहाशे  किलो गांजा अहमदनगर येथे पकडण्यात महसुल गुप्तवार्ता संचलनालयाला(डीआरआय) यश आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून आरोपींनी ओडिसा, नागपूर येथील जंगलामधून लपवून हा गांजा आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत एक कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचाः- महाविकास आघाडीच्या मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्विट, पोलिसांत गुन्हा दाखल

लॉकडाऊनमुळे अंमली पदार्थांचा तुडवडा पडल्यामुळे बाजारात अंमली पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात होती. त्यातून बक्कळ पैसे मिळतील या अनुषंगाने ईश्वर जालींदर दिसले, किरण बाळू साठे व मारुती राजेंद्र जारे या आरोपींनी या तस्करीचा प्लाँन आखला. मात्र याची कूणकूण डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार  हे आरोपी स्वीफ्ट कारमधून गांजा असलेल्या ट्रकच्या पुढे जात होते. त्यावेळी डीआरआयच्या अधिका-यांनी अहमद नगर येथून या आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी ओडिसा व त्यानंतर नागपूर येथून या ट्रकला एस्कॉर्ट करत आणले होते.

हेही वाचाः- पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

ट्रकमधून ६३७ किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ९५ लाख ५५ हजार ३०० रुपये आहे. पण सध्या लॉकडाऊनच्या काळात अंमली पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दुप्पट भावाने अंमली पदार्थांची विक्री होत आहे. प्राथमिक तपासात उडीसा येथे हा गांजा उगवण्यात आला असून तेथील जंगल परिसराशी संबंधीत आहे. याशिवाय सध्या सर्वत्र नाकाबंदी असल्यामुळे पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून आरोपी या ट्रकला एस्कॉर्ट करत होते. पण लॉकडाऊनच्या काळातही आरोपींनी एका राज्यातून दुस-या राज्यात हा माल आणला आणि हा प्रकार स्थानिक यंत्रणांच्या लक्षात आला नाही, ही आश्चर्याची बाब असल्याचे अधिका-याने सांगितले. आरोपीना याप्रकरणी नागपूर न्यायालयात हजर करण्यात आले असून २९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा