ईस्टर्न फ्रीवेवर ७ वाहनांचा विचित्र अपघात, वाहतूक कोंडी!

आगीच्या घटनांमुळे आधीच चक्रावलेल्या मुंबईकरांना रविवारी सुट्टीच्या दिवशी नवा धक्का बसला. पूर्व द्रुतगती मार्ग अर्थात इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दुपारच्या सुमारास एक अजब अपघात घडला.

ईस्टर्न फ्रीवेवर ७ वाहनांचा विचित्र अपघात, वाहतूक कोंडी!
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत घडत असलेल्या आगीच्या आणि अपघातांच्या घटनांमुळे मुंबईवर कुणाची वक्रदृष्टी आहे की काय? असा प्रश्न कुणा ज्योतिषाला पडला, तर नवल वाटायला नको! आगीच्या घटनांमुळे आधीच चक्रावलेल्या मुंबईकरांना रविवारी सुट्टीच्या दिवशी नवा धक्का बसला. पूर्व द्रुतगती मार्ग अर्थात इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दुपारच्या सुमारास एक अजब अपघात घडला.



७ वाहनांची साडेसाती!

विक्रोळीच्या ईस्टर्न फ्रीवेवर एका विचित्र अपघातात ७ गाड्या एकामागोमाग एक धडकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणही जखमी झालेले नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.




पहिल्याने दाबला ब्रेक, मागचे धडकले थेट!

पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळीच्या कन्नमवर नगर परिसरात भरधाव वेगात असलेल्या एका कार चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून वेगात असलेल्या ७ गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, घडलेल्या या विचित्र अपघातामुळे वाहन चालकांचे मोठे नुकसान झाले आहे.



आधीच थंडी, त्यात वाहतूक कोंडी!

या अपघातामुळे काही वेळ पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र, वेळीच वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद स्थानिक पोलिसांनी केली असून नेमकी कुणाची चूक आहे? याची तपासणी महामार्ग पोलिस करत आहेत. यासाठी महामार्गावर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची मदत पोलिस घेत आहेत.


हेही वाचा

दादरमध्ये आहात? मग मोबाईल सांभाळा!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा