काम नाही म्हणून महिलांनी सुरू केला जुगार अड्डा

याप्रकरणी ७ महिलांना अटक केली आहे.

काम नाही म्हणून महिलांनी सुरू केला जुगार अड्डा
SHARES

उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) कोरोनाच्या काळात महिलांनी एका घरात चक्क जुगाराचे अड्डा भरवला होता. मात्र पोलिसांनी या जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून जुगाराचा अड्डा उध्वस्त केला आहे. याप्रकरणी ७ महिलांना अटक केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महिला जुगार खेळत होत्या. या महिला मोबाईलद्वारे एकमेकांना संपर्क करून एका फ्लॅटमध्ये एकत्र होऊन तीन पत्तीचा जुगार खेळायच्या. ज्या महिलेच्या घरी हा अड्डा होता, त्या महिलेला एक ठराविक मोबदला दिला जायचा.

चाळीशी ओलांडलेल्या या महिलांना घरात जास्त काम नसायचं, म्हणून करायचं काय तर एकीनं पुढाकार घेत सर्व महिलांना आपल्या घरी बोलावून तीन पत्तीचा जुगार खेळण्याचा प्लान केला.

यासंबंधी मध्यवर्ती पोलिसांना काही दिवसांपासून याची माहिती मिळत होती. मात्र याची कुणकुण या जुगार खेळणाऱ्या महिलांना सुद्धा झाली. म्हणून त्या रोज फोनवर एकमेकांशी बोलायच्या. मात्र जुगार खेळण्यासाठी एकत्र येत नव्हत्या. अखेर १८ तारखेला या सात महिला संध्याकाळी ५ वाजता जुगार खेळण्यासाठी एकत्र जमल्या होत्या.

पोलिसांनी हीच संधी साधत त्या अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांनी या धाडीत या महिलांकडून जुगाराची ४७ हजारांची रक्कम जप्त केली.

तसंच जुगार ऍक्ट आणि कोविड प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करत जुगार खेळणाऱ्या सात महिलांना अटक केली आहे. अटक करून कोर्टात हजर केलं असता कोर्टानं या महिलांना जामिनावर सोडून देण्यात आलं आहे.



हेही वाचा

गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी माजी सरपंचाला अटक

मार्च २०२३ पर्यंत लोकलच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा