Advertisement

मार्च २०२३ पर्यंत लोकलच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार

लोकल ट्रेनमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आता मुंबई रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागानं मार्च २०२३ पर्यंत सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्च २०२३ पर्यंत लोकलच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत महिला प्रवाशांची अधिक आहे. मात्र या प्रवाशांना अनेकदा प्रवासादरम्यान धक्काबुक्की, छेडछाडीच्या घटनांचा सामना करावा लागतो. त्यामुळं या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, लोकल ट्रेनमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आता मुंबई रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागानं मार्च २०२३ पर्यंत सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२०२१ रोजी मुंबई विभागाच्या मध्य रेल्वेनं महिला प्रवाशांच्या डब्यात ६०५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. आतापर्यंत, मध्य रेल्वेने महिला डब्यांमध्ये आणि वेगवेगळ्या स्टेशनवर एकूण ३,१२२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

महिला रेल्वेतून प्रवास करताना त्यांच्याबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. याकरता, येत्या एक वर्षात मुंबई मध्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व लोकल ट्रेनच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे.

या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद होणाऱ्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेकडून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. कंट्रोल रूममध्ये, RPF कर्मचारी हे महिलांचे डबे आणि स्टेशन परिसरात दिवसाचे 24 तास घडणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवतील.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा