पैसे बदलण्याच्या रांगेत उभ्या राहिलेल्या वृद्धाचा मृत्यू


पैसे बदलण्याच्या रांगेत उभ्या राहिलेल्या वृद्धाचा मृत्यू
SHARES

मुलुंड - तुमच्याकडच्या हजार-पाचशेच्या नोटा बदलून घेण्याची घाई करू नका. त्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे हवालदिल होण्याची, त्रस्त होण्याची गरज नाही असं आवाहन सर्वच पातळ्यांवरून होतंय. पण त्याच्याकडे लक्ष न देणं मुलुंडमध्ये एका वृद्धासाठी जीवघेणं ठरलंय...

उत्तम आर्थिक परिस्थिती असलेल्या 73 वर्षांच्या विश्वनाथ वर्तक यांना नोटा बदलून घेण्याची घाई करायची खरं तर काहीच गरज नव्हती. त्यांची दोन्ही मुलं चांगल्या पदावर नोकरी करतायत तर पत्नी निवृत्त शिक्षिका आहेत. उच्च रक्तदाबाचा त्रास असूनही हरीओमनगर परिसरातल्या स्टेट बँकेत पैसे बदलण्यासाठी ते रांगेत उभे राहिले. मात्र बँकेबाहेरच चक्कर येऊन ते कोसळले. वर्तक यांच्या कुटुंबीयांनी पोलीस तक्रार केल्यावर त्यांचा मृतदेह नवघर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी वीर सावरकर रुग्णालयात नेला. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं स्पष्ट झालं, अशी माहिती विश्वनाथ वर्तक यांचे धाकटे पुत्र अनिरुद्ध यांनी दिली.
नागरिकांनी घाई करू नये. पैसे बदलण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत वेळ आहे, असं आवाहन नवघर पोलीस ठाण्यातल्या उपनिरिक्षक प्रियंका खरडमल यांनी केलंय.

संबंधित विषय