७३ वर्षाच्या वृद्धाने केला ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ

नेहरूनगर येथील रिक्षा स्टॅडमागे तिला नेत, तिच्याशी अश्लील चाळे केले.याबाबत कुणाला ही सांगितल्यास अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली.

७३ वर्षाच्या वृद्धाने केला ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ
SHARES

मुंबईच्या विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या ८ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या विकृत वृद्धाला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. विलेपार्ले येथील बस स्टॅडजवळ पीडित मुलीला एकटीपाहून त्याने उभ्या असलेल्या रिक्षात तिला नेत, तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसअधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ वावळ यांनी दिली. 

हेही वाचाः- आता वांद्र्यातही धावणार बेस्टची मिनी बस

 पीडित मुलगी आणि ७३ वर्षीय वयोवृद्ध आरोपी हे एकाच परिसरात शेजारी शेजारी राहतात. ६ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी परिसरात खेळत असताना. त्याने तिला कुणाचे ही लक्ष नसल्याचे पाहून नेहरूनगर येथे पळवून आणले. रात्रीची वेळ असल्यामुळे त्याने उभ्या असलेल्या नेहरूनगर येथील रिक्षा स्टॅडमागे तिला नेत, तिच्याशी अश्लील चाळे केले.याबाबत कुणाला ही सांगितल्यास अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. तो पीडित मुलीला घेऊन परत आल्यानंतर वेदनांनी असह्य झालेल्या मुलीने या घटनेची माहिती तिच्या घरातल्यांना दिली. 

 हेही वाचाः- हिंगणघाट जळीतकांड: आरोपीला फासावर लटकवू- मुख्यमंत्री

 या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आईने तिला तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेत, पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी ३५४(अ) भा.द.वी. आणि पोस्को गुन्ह्यांअंतर्गत गुन्हा नोंदवून त्या वृद्धाला अटक केली. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा