Advertisement

आता वांद्र्यातही धावणार बेस्टची मिनी बस

वांद्रे (Bandra) परिसरातही ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळं येथील रहिवाशांना (Residence) मोठा दिलासा मिळाला आहे.

आता वांद्र्यातही धावणार बेस्टची मिनी बस
SHARES

गल्लोगल्ली वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत असल्यानं प्रवाशांना अधिक वेळ खर्च करावा लागतो. मुंबईतील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळं सामान्यांना मोठ्या त्रासाला सामेरं जावं लागतं. मात्र, प्रवाशांची या त्रासातून सुटका करण्यासाठी बेस्टनं (BEST) काही महिन्यांपूर्वी मिनी एसी बसची (Mini AC Bus) सेवा सुरू केली.

मुंबईतील अनेक मार्गावर ही बस धावत आहे. या बसच्या माध्यमातून प्रवाशांना कमी तिकीट दरात गारेगार प्रवास करता येतो. त्यामुळं प्रवाशांची या मिनी एसी बसला मागणी वाढली आहे. प्रवाशांचा वाढलेला प्रतिसाद पाहता बेस्टनं अनेक छोट्या रस्त्याच्या व वर्दळीच्या मार्गावर ही सेवा सुरू केली आहे.

बेस्टनं काही दिवसांपूर्वीचं गोरेगाव (Goregaon) व ग्रॅण्ट रोड (Grant Road) परिसरात ही सेवा सुरू केली. त्याचप्रमाणं आता वांद्रे (Bandra) परिसरातही ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळं येथील रहिवाशांना (Residence) मोठा दिलासा मिळाला आहे.

बस मार्ग

  • बस मार्ग ए-२१९ ही वांद्रे रेल्वे स्थानक (प) ते वांद्रे रेक्लामेशन बस स्थानक या मार्गावर चालविण्यात येणार आहे. पहिली बस ६.०० वाजता चालविण्यात येणार असून, शेवटची बस १०.०० वाजता चालविण्यात येणार आहे.
  • बस मार्ग ए-२२० ही वांद्रे रेल्वे स्थानक (प) ते शेरलीं गाव बांद्रा या मार्गावर चालविण्यात येणार आहे. पहिली बस सकाळी ६.०० वाजता व शेवटची बस १०.०० वाजता चालविण्यात येणार आहे.हेही वाचा -

मुंबईकर काम्या कार्तिकेयन जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक

राज्य सरकार सुरू करणार ICSE, CBSE शाळासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा