Advertisement

राज्य सरकार सुरू करणार ICSE, CBSE शाळा

महापालिकाप्रमाणेच राज्य शालेय शिक्षण विभागही आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळा राज्यभर सुरू करणार आहे.

राज्य सरकार सुरू करणार ICSE, CBSE शाळा
SHARES

मुंबई महापालिकेनं २०२०-२१ वर्षाचा शैक्षणिक अर्थसंकल्प (Education Budget) सादर केला. यामध्ये महापालिकेनं  (BMC) आयसीएसई (ICSE), सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी विशेष रकमेची तरतूदही केली आहे. मात्र, आता महापालिकाप्रमाणेच राज्य शालेय शिक्षण विभागही आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळा राज्यभर सुरू करणार आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी माहिती दिली आहे.

राज्यभरातील (Maharashtra) इंग्रजी शाळामध्ये मराठीला (Marathi) प्राधान्य देणासाठी मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात येत आहे. मात्र, आता राज्य सरकारनं (State Government) इंग्रजी बोर्डाच्या शाळा राज्यभर उघडण्याचा निर्णय घेतल्यानं मराठी शाळांसाठी आणि मायबोलीच्या शिक्षणासाठी हा निर्णय मोठा वाद निर्माण करण्याची चिन्हे आहेत.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, सध्या इंग्रजी माध्यमांकडे पालक (Parents) आणि विद्यार्थ्यांचा (Steudents) कल आहे. त्यामुळं शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये त्यांच्या बदल्या कराव्या लागत आहेत. बाहेरच्या बोर्डामुळं मराठी शाळा आणि विद्यार्थी संख्या कमी होवू लागल्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये चिंता पसरली आहे. त्यामुळं शालेय शिक्षण विभागसुद्धा आईसीएसई (ICSE) व सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या शाळा सुरु करणार आहेहेही वाचा -

मेट्रोच्या 'या' डेपोचं ९० टक्के काम पूर्ण

९३ च्या स्फोटातील आरोपीला मुंबई विमानतळावरून अटकRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा