Advertisement

मुंबईकर काम्या कार्तिकेयन जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक

मुंबईतील काम्या कार्तिकेयन या १२ वर्षीय विद्यार्थिनीनं जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा विक्रम केला आहे

मुंबईकर काम्या कार्तिकेयन जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक
SHARES

मुंबईतील काम्या कार्तिकेयन या १२ वर्षीय विद्यार्थिनीनं जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा विक्रम केला आहे. काम्या कार्तिकेयननं अर्जेंटिनामधील अ‍ॅण्डिच पर्वतराजीतील अ‍ॅकॉन्ग्वा हे सर्वोच्च शिखर सर केलं आहे. तसंच, या शिखरावर यशस्वी चढाई करणारी जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा विक्रम केला. ६,९६२ मीटर उंचीचं अ‍ॅकॉन्ग्वा शिखर हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे.

काम्या भारतीय नौदलातर्फे चालविल्या जाणाऱ्या नेव्ही चिड्रेन स्कूलची इयत्ता ७वीची विद्यार्थिनी आहे. तिनं अ‍ॅकॉन्ग्वा शिखरावर १ फेब्रुवारीला तिरंगा ध्वज फडकविल्याचं संरक्षण दलांकडून माहिती देण्यात आली. काम्याचे वडील एस. कार्तिकेयन भारतीय नौदलात कमांडर, तर आई लावण्या पूर्व प्राथमिक शिक्षिका आहे.

नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस अ‍ॅडमिरल अजित कुमार यांनी काम्याचा सत्कार करताना तिची जिद्द व आत्मविश्वासाचे कौतुक केलं. काम्याचे हे यश संपूर्ण नौदल परिवारासाठी अभिमाना१स्पद असल्याचं सांगत अ‍ॅडमिरल अजित कुमार यांनी तिच्या भविष्यातील सर्व साहसी उपक्रमांना नौदलाचं संपूर्ण सहकार्य मिळेल, असं आश्वासन दिलं.

काम्याचे वडील स्वत: अनुभवी व पट्टीचं गिर्यारोहक आहेत. हिमालयातील खडतर गिर्यारोहणाच्या सुरस व साहसी कथा ऐकून तिनंही गिर्यारोहणाची स्फूर्ती घेतली. वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली तिनं गिर्यारोहणाचं प्राथमिक धडे गिरविले. पुढील वर्षी २०२१ मध्ये 'साहसवीरांचा ग्रँड स्लॅम' पूर्ण करण्याचा तिचा निश्चय आहे. यात सर्व खंडांमधील सर्व सर्वोच्च शिखरे सर करून दक्षिण व उत्तर ध्रुवावर स्कीइंग करायचे असते. आजवर मोजकेच साहसवीर हे करू शकले आहेत.

वयाच्या तिसऱ्या वर्षी काम्यानं लोणावळा परिसरात सह्याद्रीच्या डोंगरांवर प्राथमिक ट्रेकिंग केलं. नवव्या वर्षी काम्याने ५,०२० मीटर उंचीच्या रूपकुंडसह हिमालयातील अनेक शिखरे आई-वडिलांसोबत सर केली. वयाच्या १०व्या वर्षी नेपाळमधील ५,३४२ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत चढाई. लगोलग लडाखमधील स्टोक कांगडी (६,१५३ मीटर) शिखर सर करणारी सर्वात तरुण गिर्यारोहक ठरण्याचा मान.

त्याच्या पुढील वर्षात किलिमांजारो (५,८९५ मीटर), एलब्रुस (५,६४२ मीटर) आणि कॉस्कीयुस्को (२,२२८ मीटर) या अनुक्रमे आफ्रिका, युरोप व आॅस्ट्रेलिया खंंडांतील सर्वात उंच शिखरांवर यशस्वी चढाई.


हेही वाचा -

‘सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाची डोबिवलीकर अक्षया विजयी

पूनम पांडेची शिल्पा शेट्टीच्या पतीविरोधात तक्रार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा