Advertisement

‘सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाची डोबिवलीकर अक्षया विजयी

सहा स्पर्धकांपैकी अक्षया अय्यरनं सगळ्यांची मनं जिंकत बाजी मारली. पद्मश्री हरीहरनजी यांनी सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याचं नाव घोषित केलं.

‘सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाची डोबिवलीकर अक्षया विजयी
SHARES

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमानं अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकली. रविवारी या कार्यक्रमाचा फिनाले पार पडला. अक्षया अय्यर ही यंदाची या कार्यक्रमाची विजेता ठरली आहे. पद्मश्री हरीहरनजी यांनी सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याचं नाव घोषित केलं. अक्षया ही सध्या डोंबिवलीत वास्तव्यास आहे. 

'हे' आहेत कार्यक्रमाचे फायनलिस्ट

१) मंचाला रविंद्र खोमणे

२) स्वराली जोशी 

३) अक्षया अय्यर 

४) अमोल घोडके 

५) राजू नदाफ 

६) श्रावणी वागळे

डोंबिवलीची अक्षया विजयी

 ‘सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात २२ स्पर्धकांचा सुरेल प्रवास पाच महिन्यांआधी सुरू झाला आणि या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले. याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला रविंद्र खोमणे, स्वराली जोशी, अक्षया अय्यर, अमोल घोडके, राजू नदाफ, श्रावणी वागळे हे सहा शिलेदार मिळाले. या सहा स्पर्धकांमध्ये सूर नवा ध्यास नवा-स्वप्न सुरांचे स्वप्न सार्‍यांचे कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रविवारी रंगला. या सहा जणांमधून अक्षया अय्यरनं सगळ्यांची मनं जिंकत  बाजी मारली. पद्मश्री हरीहरनजी यांनी सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याचं नाव घोषित केलं.


जागतिक कर्करोग दिन : बॉलिवूडमधल्या 'या' कलाकारांनी केली कॅन्सरवर मात


'हे' पारितोषिक मिळाले

अक्षया अय्यरला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, वामन हरी पेठे सन्स यांनी डिझाईन केलेली मानाची सुवर्णकटयार आणि केसरी टुर्सतर्फे सिंगापूरची टुर मिळाली. तसंच रविंद्र खोमणेला, स्वराली जोशी, अमोल घोडके, राजू नदाफ, श्रावणी वागळे या उपविजेत्यांना कलर्स मराठीतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी, तसंच उपविजेते, कॅप्टन्स, सूत्रसंचालक यांना केसरी टुर्सतर्फे गिफ्ट व्हाऊचर मिळालं.

मराठी कलाकारांचीही हजेरी

कार्यक्रमामधील एका पेक्षा एक अशा २२ सुरेल स्पर्धकांना मागे टाकत या सहा स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला. महाअंतिम सोहळ्यामध्ये अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांनी त्यांच्या दमदार गाण्यांनी स्पर्धक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. महेश काळे यांनी गाणं सादर करून उपस्थितांना पुन्हा एकदा भारावून टाकलं.

कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी कलर्स मराठीच्या परिवारातील प्रेक्षकांचे लाडके कलाकार उपस्थित होते. सुखाच्या सरींनी हे मन बावरे, जीव झाला येडापिसा, स्वामिनी, बाळूमामाच्या नावानं चांगभलं आणि राजा रानीची गं जोडी मालिकेमधील कलाकारांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती.हेही वाचा

रोहिणी हट्टंगडी 'या' मालिकेत साकारणार खट्याळ आजीची भूमिका

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेवरील अफवांवर विश्वास ठेवू नका : डॉ. अमोल कोल्हे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा