Advertisement

हिंगणघाट जळीतकांड: आरोपीला फासावर लटकवू- मुख्यमंत्री

या प्रकरणातील आरोपीला कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवली जाणार नाही. या प्रकरणाचा पाठपुरावा करून गुन्हा लवकरात लवकर सिद्ध करून आरोपीला फासावर लटकवू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंगणघाट जळीतकांड: आरोपीला फासावर लटकवू- मुख्यमंत्री
SHARES

हिंगणघाट जळीतकांडातील (Hinganghat case) पीडित तरुणीचा सोमवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणातील आरोपीला कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवली जाणार नाही. या प्रकरणाचा पाठपुरावा करून गुन्हा लवकरात लवकर सिद्ध करून आरोपीला फासावर लटकवू. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम (ad ujjwal nikam) यांची नियुक्ती करण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सांगितलं. 

हेही वाचा- महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे, इथं तलवारीची भाषा चालणार नाही- नवाब मलिक

अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या प्रकरणाच्या बाबतीत घडू देणार नाही. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर सरकारचा कटाक्ष असेल. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोरातील कठोऱ शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल. यासाठी अॅड. उज्ज्वल निकम (ad ujjwal nikam) यांची नियुक्ती करण्यात येत आहे. पीडीता, तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू. शिवाय या पद्धतीचं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही, असा कायदा करु, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी (cm uddhav thackeray) दिलं.

त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनीही पीडितेच्या मृत्यूनंतर संताप व्यक्त केला. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशीलपणे गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरात लवकर मिळेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल.

हेही वाचा- आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही- उद्धव ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा