Advertisement

महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे, इथं तलवारीची भाषा चालणार नाही- नवाब मलिक

महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे, इथं तलवारीची भाषा चालणार नाही, अशा शब्दांत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी राज ठाकरे यांना फटकारलं आहे.

महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे, इथं तलवारीची भाषा चालणार नाही- नवाब मलिक
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांनी केलेल्या भाषणादरम्यान दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, असा इशारा घुसखोरांना दिला होता. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे, इथं तलवारीची भाषा चालणार नाही, अशा शब्दांत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी राज ठाकरे यांना फटकारलं आहे.

दगडाला दगडाने आणि तलवारीने उत्तर देऊ, असं कोणी बोलत असेल तर महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. शांतीप्रिय लोकं या राज्यात राहतात. हिंसा करण्याची भाषा असेल तर आम्ही गांधीवादी असून हे राज्यात खपवून घेणार नाही, असं म्हणत नवाब मलिक (nawab malik) यांनी राज ठाकरे (raj thackeray) यांना इशारा दिला. सोबतच मनसेला कुणाचीही साथ मिळत असली, तरी राज्याला त्याचा काहीही फरक पडत नाही, असं म्हणत त्यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष टीका केली. 

हेही वाचा- तर, तलवारीला तलवारीने उत्तर देऊ- राज ठाकरे

सीएए (caa) आणि एनआरसीविरोधात (nrc) मोर्चा काढणाऱ्या लोकांना हा कायदा कळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पण हा मोर्चा काढणाऱ्यांना तरी हा कायदा कळलेला आहे का? भारत हा धर्मशाळा झाल्याचं ते सांगतात. एनआरसीचा कायदा झाल्यामुळेच धर्माच्या आधारावर त्यांना नागरिकता देण्याचा निर्णय झालेला आहे. यामुळेच देशाचं धर्मशाळेत रुपांतर झालं आहे. देशात २ कोटी बांगलादेशी राहतात, असा दावा भाजपसुद्धा (bjp) आसाममध्ये जाऊन करतं. पण जेव्हा आकडे समोर आले, तेव्हा १९ लाखांमध्ये १६ लाख हिंदू आणि ३ लाख मुस्लिम (muslims) आहेत. त्यामुळे उगाच आकडे फेकणं योग्य नाही. 

घुसखोरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. त्यांना न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या देशात पाठवलं जातं. पण अशा प्रकारे दगड, तलवारीचं उत्तर तलवारीने देऊ अशी भाषा कोणी करून नये. या देशात काहीजण धर्म-भाषेच्या नावाखाली राजकारण करत आहेत. महाराष्ट्रात राहणारे मुस्लिम हे मराठीच आहे, त्यांना कुणी सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा भारत हा माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असं म्हणता, तेव्हा अशी भाषा करून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा मलिक यांनी दिला. 

हेही वाचा- आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही- उद्धव ठाकरे

दरम्यान पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना भारतातून हाकलून देण्याच्या मागणीसाठी मनसेने रविवार ९ फेब्रुवारी रोजी गिरगाव हिंदू जिमखाना ते आझाद मैदान महामोर्चा (mns rally) काढला होता. या मोर्चाचं नेतृत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. या मोर्चासाठी राज्यभरातून हजारो मनसैनिक दाखल झाले होते. या मोर्चानंतर केलेल्या भाषणात राज ठाकरे (raj thackeray) यांनी घुसखोरांवर हल्लाबोल केला. भारताने माणुसकीचा ठेका घेतलेला नाही. माझा देश म्हणजे धर्मशाळा वाटली की काय? या देशात राहणाऱ्या घुसखोरांना हाकलून साफसफाई करण्याची वेळ आली आहे. आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. पण इथून पुढं दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, असं राज म्हणाले. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा