मुंबईत लॉकडाऊनमुळे बालसुधारगृहात अडकलेत ७५ मुले

बाल सुधारगृहात सर्वाधिक म्हणजे १६ मुले उत्तर प्रदेशातल लखनऊ येथील आहे.

मुंबईत लॉकडाऊनमुळे बालसुधारगृहात अडकलेत ७५ मुले
SHARES

देशात बालकामगारांवर बंदी असल्याने लॉकडाऊन पूर्वी मुंबईच्या विविध भागात कारवाई करत सुटका करण्यात आलेले बालकाम मुंबईच्या बालसुधारगृहात लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. मागील ३ महिन्यांपासून या बालसुधारगृहात ७५ मुले अडकून पडली आहेत. लॉकडाऊनमुळे या मुलांचे पालक मुंबईत येऊ शकत नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान उर्वरीत मुलांसाठी प्रयत्न करूनही  परराज्यातील यंत्रणांकडूनही अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

हेही वाचाः- MH - CET परीक्षा देखील पुढे ढकलल्या, नव्यानं जाहीर होणार तारखा

आमच्याकडे बालकामगार नाहीत अशा पाट्या लावून मुंबईत अनेक ठिकाणी लहान मुलांनाच कामाला जुंपल्याचे पहायाला मिळालेले आहे. अनेकदा ही मुले घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे गावसोडून मुंबईची वाट धरतात. त्याच प्रामुख्याने उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा या राज्यातील मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सध्या या मुलांचे काम सुटलेले आहेत. अनेकांचे खायचे वांदे झालेले आहेत. अशा मुलांना पोलिस डोंगरीच्या बाल सुधारगृहात ठेवतात. मात्र लॉकडाऊनमुळे त्याचे मूळगावी परतण्याचे वांदे झालेले आहेत. मागील ३ महिन्यांपासून ९ राज्यातील ७५ मुले ही बालसुधारगृहातच अडकून पडलेली आहेत. लॉकडाऊनमुळे ई-पासचे पैसे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे परत जाण्यासाठी ही या मुलांकडे पैसे नसल्याचे सांगितले जाते. तीन महिन्यात केवळ एकाच कुटुंब त्याच्या मुलाला घेऊन जाण्यासाठी पोहचल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचाः- Total Lock down in Ambernath: आता अंबरनाथमध्येही ३० जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन

फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी एका बांगड्या बनवण्याच्या कारखान्यात छापा टाकला. त्यावेळी उत्तरप्रदेशचा एक १५ वर्षाचा मुलगा पोलिसांना काम करताना आढळून आला. सहा हजार प्रतिमहिना त्याला पगार मिळत होता. पोलिसांनी त्या मुलाची सुटका करून त्याची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात केली. नोव्हेंबर महियात तो आपल्या मोठ्याभावासोबत मुंबईत कामाच्या शोधात आला होता. कामाच्या ठिकाणी त्याला १४ तास राबवून घेतले जायचे, पण या मुलाकडे कोणता पर्याय नव्हता. बाल सुधारगृहातील कर्मचा-यांनी त्याला विश्वासात घेऊन या मुलाचा कुटुंबियांची माहिती घेतली व त्यांना संपर्क साधला. तुमचा मुलगा सुखरूप असून लवकरच त्याला तुमच्या गावी आणले जाईल, असे डोंगरी बाल सुधारगृहाकडून या मुलांच्या कुटंबियांना सांगण्यात आले. कुटुंबियही मुलगा येण्याची वाट पाहू लागले. सर्व ठीक होतेय, असे वाटत असतानाच कोरोना संकट रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. तेव्हापासून हा मुलगा डोंगरी सुधारगृहात अडकून पडला असून कुटुंबियांना लवकरच भेटता येईल, या आशेवर दिवस घालवत आहे. या मुलाप्रमाणेच सुटका करण्यात आलेले ७५ बाल मजूर कुटुंबाला भेटण्याच्या प्रतिक्षेत आहेत. स्वयंसेवी संस्था, पोलिस यांनी या मुलांची सुटका केली होती. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उडीसा, तामिळनाडू, केरळा,पंजाब, पश्चिम बंगाल व दिल्ली अशा विविध राज्यातील ही मुले असून त्यात हरवलेली, घरून पळून आलेल्या मुलांचाही समावेश आहे. सुटका केल्यानंतर बाल कल्याण समितीच्या मार्फत संपर्क साधल्यानंतर मुलांचे कुटुंबय येऊन मुलांना घेऊन जातात. पण लॉकडाऊनच्या काळात ई पास, वाहतुकीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे गेल्या तीन महिन्यात केवळ एकच कुटुंब या मुलांना नेण्यासाठी डोंगरी बाल सुधार गृहात येऊ शकल्याची माहिती एका अधिका-याने दिली. दुस-या मार्गातमध्ये खूप दिवस मुलांना कोणी नेण्यासाठी आले नाही, की त्या मुलाच्या राज्यातील बाल कल्याण विभागाशी संपर्क साधण्यात येतो. त्यानंतर त्या राज्यातील मुलांना एकत्र संबंधीत राज्यात पाठवण्यात येते.त्यानंतर त्या राज्यातील यंत्रणा या मुलांच्या कुटुंबियांचा शोध घेते व त्यांची कुटुंबाशी भेट घडवून देते. पण लॉकडाऊनमध्ये संबंधीत राज्यातील बाल कल्याण विभागांकडून परवानगी न मिळाल्यामुळे या मुलांना पाठवणे शक्य झालेले नाही.

हेही वाचाः-SSC-HSC Results: जुलै अखेरपर्यंत लागणार दहावी, बारावीचा निकाल

बाल सुधारगृहात सर्वाधिक म्हणजे १६ मुले उत्तर प्रदेशातल लखनऊ येथील आहे.तेथीलही संबंधीत विभागांशी संपर्कही साधण्यात आला आहे. पण अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसात मिळत नसल्याचे एका अधिका-याने सांगितले. संबंधीत राज्यांच्या छोट्याश्या पुढाकारामुळे या मुलांना त्यांच्या कुटुंबांशी भेटता येईल. एप्रिल महिन्यात सुधारगृहातील एक नर्स व दोन मुलांना कोरोना झाला होता. त्यामुळे नव्याने सुटका करण्यात येणा-या मुलांना थेट डेविड ससून बालगृहात पाठवण्यात येते. कोरोनामुळे मुलांमध्ये काहीप्रमाणात तणाव आहे, त्यामुळे मुलाचे अधून मधून कुटुंबियांसोबत फोनवरून बोलणे करून दिले जात आहे. त्यामुळे तणावाच्या काळात मुलांसाठी काही क्षण आनंदाचे मिळत आहेत. तसेच विधीसंघर्षग्रस्त मुलांपासून वेगळ्या विभागात त्यांना ठेवले जात आहे. तसेच मुलांचा तणाव कमी करण्यासाठी त्यांचे नियमीत काऊंसलिंग केले जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा