750 मंडळांवर कारवाई होणार

 Mumbai
750 मंडळांवर कारवाई होणार

मुंबई - शहरात गणेशोत्सव आनंदात साजरा होत असतानाच अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने परवानगी न घेता मंडप उभारणा-या मंडळांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अशा मंडळांना पालिकेकडून नोटिसा बजावण्यात येत असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे. 

मंडप उभारण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक असते. त्यानुसार 1160 मंडळांना परवानगी देण्यात आली. तर अंदाजे 750 मंडळांना परवानगी नाकारण्यात आली. यापैकी अनेक मंडळांनी परवानगी नसतानाही मंडप उभारत गणेशाची स्थापना केली आहे. त्यामुळे पालिकेने आता अशा मंडळांना नोटिसा बजावत त्यांच्याविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. 

याविषयी गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीशी संपर्क साधला असता त्यांनी 'नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांक़डूनच समोर आली आहे. अद्याप कोणत्याही मंडळाला नोटीस मिळालेली नाही, नोटीस मिळाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू', असे सांगितले. 

Loading Comments