लैंगिक अत्याचार प्रकरणात दिग्दर्शक अनुराग कश्यपची ८ तास चौकशी

अनुरागनं देखील काही ट्विट करून देखील पायल घोष हिने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याने ट्विट करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

लैंगिक अत्याचार प्रकरणात दिग्दर्शक अनुराग कश्यपची ८ तास चौकशी
SHARES

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैगिक अत्याचाराचे आरोप केल्याप्रकरणी गुरूवारी वर्सोवा पोलिसांनी अनुराग कश्यपची चौकशी केली.  मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स पाठवुन गुरूवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार कश्यप त्याच्या वकिलासोबत चौकशीसाठी हजर राहिला होता. तब्बल ८ तासाच्या चौकशीनंतर कश्यपला पोलिसांनी सोडले. तर दुसरीकडे तक्रारदारर पीडित महिला अभिनेत्रीची कूपर रुग्णलयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. 

हेही वाचा ः-मुंबईत लेप्टोस्पायरोसिसमुळे एका मुलाचा मृत्यू

 तक्सोरारदार अभिनेत्रीसोबत गैरवर्तन आणि लैंगिक शोषण केल्या प्रकरणी मुंबई पोलिसाकडून अनुरागला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला होता. गुरुवारी सकाळी १० वाजता अनुरागला चौकशीसाठी वर्सोवा पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्यानुसार अनुराग कश्यप गुरूवारी सकाळी वर्सोवा पोलिस ठाण्यात दाखल झाला. यावेळी त्याचे वकील प्रियांका खिमानीही त्याच्यासोबत होती. पीडित अभिनेत्रीने एक ट्विट करत अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. अनुरागने माझ्यासोबत असभ्य वर्तन केले असून मला वाईट वागणूक दिली होती. या व्यक्तीवर कारावाई करा तेव्हाच या माणसाचे खरे रुप समोर येईल. या ट्विटमुळे माझ्या जीवाला धोका असून माझी मदत करा, असे म्हणत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी पायलची भेट घेतली आहे, तसेच, दोघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अनुराग कश्यप विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

हेही वाचाः- अंधेरीतील 'त्या' इमारतीत २२ जणांना कोरोनाचा संसर्ग

 तर दुसरीकडे  एक पत्रक जारी करत अनुरागच्या वकिलांनी त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. माझ्या अशीलावर लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे करण्यात आलेले आरोप चुकीचे असून यामुळे त्याना दुःख झाले आहे. हे सर्व आरोप हे बिनबुडाचे, खोटे आहेत. महिलांवर होणारे अत्याचार समोर यावेत यासाठी सुरू झालेली मी टू चळवळ सध्या स्वतःच्या सोयीप्रमाणे स्वार्थासाठी वापरली जात असून यामुळे समोरच्या व्यक्तीचे चारित्र्य हनन होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून हे खोटे आरोपच या चळवळीला कमकुवत बनवितात असे अनुरागच्या वकिलांनी म्हटले आहे. दरम्यान, अनुरागनं देखील काही ट्विट करून देखील पायल घोष हिने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याने ट्विट करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. आणखी आक्रमणे व्हायची आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. अनेकांचे फोन आले, की काही बोलू नकोस, शांत बस. हे पण माहित आहे की, माहित नाही कुठल्या दिशेने बाण येणार आहेत, असे अनुरागने त्याच्या ट्विटमध्ये केले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा