कोरोनाचा कहर! राज्यात 841 नवे रुग्ण, 24 तासात 34 जणांचा मृत्यू


कोरोनाचा कहर! राज्यात 841 नवे रुग्ण, 24 तासात 34 जणांचा मृत्यू
SHARES

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात  मंगळवारी कोरोनाचे 841 नवे रुग्ण आढळून आले आहे. 354 वारी  रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 12 हजार 089 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर  मंगळवारी कोरोना या महामारीने 35 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 525 इतकी आहे.

राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. मंगळवारी दिवसभरात कोरोनाच्या  1 लाख 82 हजार 884 नमुन्यांपैकी  1 लाख 67 हजार  205 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर  15 हजार 525 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख  99 हजार 182  लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 12 हजार 456 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर मंगळवारी या महामारीने राज्यभरात 34 जणांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या आता 617 इतकी झाली आहे.

मंगळवारी मृत पावलेल्या 34 नागरिकांमध्ये मुंबईतील 26 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरातील 6 आहेत. औरंगाबाद 1, कोल्हापूर मधील 1 व्यक्तीचा समावेश आहे. मंगळवारी झालेल्या 34 मृत्यूमध्ये 24 पुरूष आणि 10 महिलांचा समावेश आहे. 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत तर 16 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत.  या 35 मृतांपैकी 28 जणांमध्ये (82 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा