चेंबूरमध्ये पोलिस चौकीसमोरच चोरी

 RC Marg
चेंबूरमध्ये पोलिस चौकीसमोरच चोरी
चेंबूरमध्ये पोलिस चौकीसमोरच चोरी
See all

चेंबूर कॅम्प - परिसरात बुधवारी पहाटे चोरट्यांनी एका कपड्याच्या दुकानाचं शटर तोडून लाखोंचा माल लंपास केला. चेंबूर पोलीस ठाण्यांतंर्गत येणाऱ्या बीट चौकी क्रमांक २ समोरच हा प्रकार घडला. सकाळी हा प्रकार लक्षात येताच दुकानदारानं पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. दुकानातील एका सीसीटीव्हीमध्ये या चोरट्यांचा चेहरा कैद झालाय. सीसीटीव्ही फुटजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading Comments