चिंचपोकळी परिसरात चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू

मुंबईतील चिंचपोकळी परिसरात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीच्या टोकावरून खाली कोसळून एका दीड वर्षांच्या चिमुरडीचा मृत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

SHARE

मुंबईतील चिंचपोकळी परिसरात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीच्या शेडवरून पडून एका दीड वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. आरोही राणे असं या चिमुरडीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी आरोही खेळता-खेळता बेपत्ता झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता आरोही इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मृतावस्थेत आढळली. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

परंतु, आरोहीच्या कुटुंबीयांनी आणि इमारतीतील रहिवाशांनी तिच्या मृत्यूमागे संशय व्यक्त केला आहे. आरोहीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.


अचानक बेपत्ता

चिंचपोकळी येथील ५ मजली प्रोग्रेसिव्ह को-ऑप. सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर आरोही आई-वडील, काका आणि १० वर्षांच्या बहिणीसोबत राहत होती. मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास खेळत असताना ती इमारतीतून अचानक बेपत्ता झाली. मुलगी गायब झाल्याचं समजताच कुटुंबीयांनी तातडीने सगळीकडे शोधाशोध सुरु केली. मात्र, मुलगी सापडत नसल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 

त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोहीच्या तपासाला सुरुवात केली आणि अखेर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीच्या शेडवर ती मृतावस्थेत सापडली. त्यानंतर आरोहीला तातडीने उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.हेही वाचा -

कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे फोडणार युतीच्या प्रचाराचा नारळसंबंधित विषय
ताज्या बातम्या