लोकलच्या डब्यात सापडला मृतदेह

 Wadala Road
लोकलच्या डब्यात सापडला मृतदेह

वडाळा - हार्बर मार्गावरील वडाळा रोड स्थानकात लोकलच्या डब्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शनिवारी रात्री लोहमार्ग पोलिसांना आढळून आला. पनवेलवरून वडाळा रोड दिशेला आलेल्या लोकलच्या डब्यात एखादा गर्दुल्ला किंवा भिकारी झोपलेला असेल असे वाटल्याने कोणत्याही प्रवाशांनी त्याला हटकले नाही. मात्र लोकल केवळ वडाळ्यापर्यंतच असल्याने प्रवाशांनी खाली उतरताच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जात सदरील मृतदेहाची ओळख पटावी यासाठी त्याची झडती घेतली. परंतु या मृतदेहाजवळ कोणतेही सामान आढळून आले नसल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. रेल्वे पोलिसांनी एडीआर नोंद करून सदरील मृतदेह शीव रुग्णालयात ठेवला आहे.

Loading Comments