राज्यात लाॅकडाऊन दरम्यान २८ कोटी ५५ लाखांचा दंड वसूल

या कारवाईत आतापर्यंत ३७,४४२ व्यक्तींना अटक करण्यात आली. ९६,४६६ वाहने जप्त केली.

राज्यात लाॅकडाऊन दरम्यान २८ कोटी ५५ लाखांचा दंड वसूल
SHARES

राज्यात कोरोना संक्रमाण वाढू लागल्यानंतर सरकारने लाँकडाऊन जाहिर केले. या काळात नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली. महाराष्ट्र अनलॉक ४ आता वेगाने कार्यरत आहे. त्यामुळे अपावाद वगळता सर्व दुकाने, सेवा, जनजीन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र असतानाच कोरोना व्हायरस संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करताना दिसत आहे. लाँकडाऊनच्या काळात आतापर्यंत पोलिसांनी २८ कोटी ५५ लाखांचा दंड वसूल केला आहे.

हेही वाचाः- महापालिकेकडून कोरोनाबाधितांना टॅब; कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार

महाराष्ट्रात अनलाँकडाऊन ४ ची जरी घोषणा करण्यात आली. तरी कोरोनाचे संक्रमण अद्याप नियंत्रणात आलेले नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ७१ हजार गुन्हे, तसेच १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल केले आहेत.  तर २८ कोटी ५५ लाख ६० हजार ९१४ रुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तर या कारवाईत आतापर्यंत ३७,४४२ व्यक्तींना अटक करण्यात आली. ९६,४६६ वाहने जप्त केली.

हेही वाचाः- राज्यातील पोलिस दलात १८९ नवे रुग्ण, आतापर्यंत २४५ पोलिसांचा मृत्यू

कोरोनाशी दोन हात करण्यात अत्यावश्य सेवेतील अधिकारी व्यस्त असताना. काही विकृत त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.  या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३६४ घटना घडल्या. त्यात ८९५ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस विभागाचा १०० नंबर  हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,१३,३५६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २२० पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २४५ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा