दहिसरमध्ये २० वर्षीय तरुणीची आत्महत्या

 Shanti Nagar
दहिसरमध्ये २० वर्षीय तरुणीची आत्महत्या

दहिसर - शांतीनगरच्या जय भवानी वेल्फेअर सोसायटीत राहणाऱ्या एका 20 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. अनुपमा गुप्ता असं या मुलीचं नाव आहे. शनिवारी घरी कोणी नसल्याचं पाहून तिने हे पाऊल उचललं. शेजारच्यांनी तिला रोहित रुग्णालयात दाखल केलं. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुपमाचे वडील मुकुंद गुप्ता हे दहिसरमध्ये भाजीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी 5 वाजता घराबाहेर पडले. त्यानंतर 7 वाजता त्यांची छोटी मुलगी शाळेत गेली. त्यांची पत्नी शौचालयाला गेली. घरी कुणीच नाही हे पाहून तिने स्वत:ला गळफास लावून घेतला. त्यानंतर लगेचच तिला जवळच्या रोहित रुग्णालयात घेऊन गेले. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अनुपमाचं पुढच्या महिन्यात लग्न होणार होतं. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Loading Comments