निर्माता फिरोज नादियावालाच्या पत्नीची जामीनावर सुटका

मुंबईतील लोखंडवाला, मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई परिसरातही रविवारी छापेमारी करण्यात आली आहे.

निर्माता फिरोज नादियावालाच्या पत्नीची जामीनावर सुटका
SHARES

बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची पाळंमुळं अतिशय खोलवर रुजली आहेत, असंच NCB तपासामध्ये दिसून येत आहे. ड्रग कनेक्शनमध्ये निर्माते फिरोज नाडियाडवाला (Film Producer Firoz Nadiadwala) यांच्या पत्नीला रविवारी  अटक केले होते.  या प्रकरणात न्यायालयाने आता फिरोज्या पत्नीला १५ हजार रुपयांच्या जामीनावर सोडण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या निधनानंतर बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन समोर आलं आहे. मुंबईतील लोखंडवाला, मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई परिसरातही रविवारी छापेमारी करण्यात आली आहे.

एनसीबीच्या टीमने अनेक फिल्मी स्टार्स, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरी छापे मारले . शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. कारवाईमध्ये १० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. नाडियाडवाला यांचा फोनही एनसीबीने जप्त केला आहे. एनसीबीने छापा मारला तेव्हा नाडियाडवाला घरात नव्हते अशी माहिती मिळत आहे. ड्रग्जच्या कारवाईमध्ये एनसीबी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आली आहे. एनसीबीच्या एका टीमने मुंबईतून इस्माइल शेख या ड्रग पेडलरला अटक केली आहे. त्याच्यासह अन्य ४ जणांनाही एनसीबीने अटक केली आहे. या ५ जणांकडे ड्रग्जचा मोठा साठाही सापडला आहे. नादियावाच्या पत्नीला NCBच्या अधिकाऱ्यांनी आज न्यायालयात हजर केले असताना. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामीनावर तिची मुक्तता केली.

हेही वाचाः- गृहमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट, चर्चांना उधाण

या प्रकऱणात यापूर्वी अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), रकुल प्रीत सिंग(Rakul Preet Singh), सारा अली खान (Sara Ali Khan) यांची नावं समोर आली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये या अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा