वीजचोरीमुळे मृत्यू, एकाला अटक


SHARE

मुंबई - गोवंडीतील बैंगनवाडी भागात विजेच्या धक्क्याने अत्तार खान(28)या तरुणाचा बुधवारी मृत्यू झाला होता. घराशेजारील गटार तुंबल्याने तो या गटारातील घाण काढण्यासाठी उतरला होता. दरम्यान गटारात वीजेच्या उघड्या तारेचा स्पर्श झाल्याने तो यामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याच्या कुटुंबियांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

या परिसरात मोठ्या प्रमाणात विजेची चोरी होत असल्याने या चोरीच्या विजेमुळेच या तरुणाला प्राण गमवावे लागले होते. याबाबत तरुणाच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, यातील अनिस कुरेशी (३४) या आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या