SHARE

चुनाभट्टी - परवाना नसताना अनधिकृतरित्या गावठी कट्टा जवळ ठेवणाऱ्या एका आरोपीला चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली आहे. शाबीर शेख (28) असे या आरोपीचे नाव असून तो कुर्ला कसाईवाडा येथे राहणारा आहे. सदर आरोपीकडे बंदूक असल्याची गुप्त माहिती चुनाभट्टी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत कुर्ला कसाईवाडा येथून त्याला गुरुवारी रात्री अटक केली. सदर आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असून त्याने हे हत्यार कुठून खरेदी केले? तसेच त्याचे कुठल्या गुन्हेगारी टोळीशी संबध आहे का? याचा तपास सुरू असल्याची माहिती चुनाभट्टी पोलिसांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या