SHARE

मालाड - अज्ञात व्यक्तींच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना मालाडच्या लिंक रोड जवळीत नाहरनगरच्या न्यू प्रभात कम्पाउंडमध्ये घडली. हल्ल्यानंतर ते चारही आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा तपास सुरू केला आहे.

18 मार्चच्या रात्री 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास काही अज्ञातांनी नवी खान उर्फ लाला नावाच्या (49) व्यक्तीवर हल्ला केला. हल्ल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर जखमी झालेल्या नवी खान यांना उपचारासाठी गोरेगांवमधल्या सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या