उद्यान एक्स्प्रेसमधून 36 लाख 30 हजार रुपये जप्त


उद्यान एक्स्प्रेसमधून 36 लाख 30 हजार रुपये जप्त
SHARES

आरपीएफने उद्यान एक्सप्रेसमधून 36 लाख 30 हजार रुपये जप्त केले आहेत. ही घटना कल्याण स्थानकात बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी उघडकीस आली. बंगळुरूहून मुंबईला येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासनीसला एका बर्थवर सामान दिसले. प्रवासी मात्र गायब होता. संशय बळावल्यानंतर त्याने लगेच रेल्वे पोलिसांना पाचारण केले. 

पोलिसांनी सामानाची झडती घेतली असता त्यामध्ये एक बॉक्स आढळून आला. तो उघडून पाहिले असता त्या बॉक्समध्ये नोटा गच्च भरल्या होत्या. संपूर्ण रकमेची मोजणी केली असता दोन हजाराच्या 605 नोटा, 500 च्या साडेचार हजारहून अधिक नोटा आणि शंभरच्या दीड हजार असे एकूण 37 लाख 30 हजार रुपये आढळून आले. या प्रकरणाची नोंद करून पोलिसांनी ही रक्कम रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे सुपूर्द केली. मिळून आलेली रक्कम तिकीट घराच्या कॅशरूमध्ये ठेवण्यात आली आहे. हा बॉक्स रेल्वेच्या डब्यात कसा आला आणि तो कुणी ठेवला, याचा तपास सध्या पोलीस करत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा