1993 साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, 6 दोषी तर, एकाची निर्दोष सुटका

 Mumbai
1993 साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, 6 दोषी तर, एकाची निर्दोष सुटका
Mumbai  -  

मुंबईतल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी शुक्रवारी विशेष टाडा न्यायालायाने अबू सालेम, गँगस्टर मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहीर मर्चेंट, करिमुल्ला शेख आणि रियाज सिद्दीकी या सहा आरोपींना दोषी ठरवले तर, अब्दुल कय्युम नावाच्या आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. या सर्व आरोपींना सन 2003 ते 2010 या कालावधीत अटक करण्यात आली होती.


हेही वाचा

असा मिळाला 257 जीवांना न्याय...


यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला मुख्य सूत्रधार याकूब मेमनला 30 जुलै 2015 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. पण मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांच्यासह एकूण 27 आरोपी अद्यापही फरार आहेत.

12 मार्च 1993 साली मुंबईतील विविध ठिकाणी झालेल्या 12 स्फोटात तब्बल 257 निष्पाप मुंबईकर मारले गेले होते. देशात आरडीएक्सद्वारे करण्यात आलेली स्फोटांची ही पहिली मालिका देखील होती. 

Loading Comments