पीडित महिलेकडून मागितली लाच, पोलीस उपनिरीक्षकाला अटक


पीडित महिलेकडून मागितली लाच, पोलीस उपनिरीक्षकाला अटक
SHARES

कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला दाद मागण्यासाठी पोलिसांत जातात, अशा महिलांचं गाऱ्हाणं ऐकून त्यांना आधार देणं, त्यांना न्याय मिळवून देणं ही खरं तर पोलिसांची जबाबदारी असते. पण अनेकदा पोलीस अशा महिलांनाही लुबाडण्यास कमी करत नाहीत. अशीच एक घटना शिवाजी नगर पोलीस ठाण्यात समोर आली असून या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ४ हजारांची लाच घेताना जालिंदर मिसाळ (५७) नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे.

मिसाळ यांनी या महिलेकडून आधीच १० हजार रुपयांची लाच घेतली होती. पण आणखी लाच घेण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. शेवटी महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचं दार ठोठावलं आणि मिसळला चांगलीच अद्दल घडवली.

कुटुंबिक हिंसाचाराला सामोरे जाणाऱ्या एका महिलेने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आपल्या नवऱ्यासह सासरच्या मंडळींविरुद्ध कुटुंबिक हिंसाचाराचा ४९८ (अ) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. महिलेचा समाज झाला कि पोलीस काही कारवाई करतील. पण केसचे तपास अधिकारी जालिंदर मिसाळ यांच्या मनात काही औरच होते. त्यांनी नवरा आणि सासरच्या मंडळींवर कारवाई करण्यासाठी लाच मागितली, महिलेने तब्बल १० हजार रुपये मिसाळ यांना दिले. पण त्यांची भूक मिटायचं नाव घेत नव्हती. त्यांनी कारवाई करण्यासाठी महिलेकडून आणखीन ४ हजार रुपये मागितले, शेवटी कंटाळून महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा दरवाजा ठोठावला.

'एसीबी'ने महिलेच्या आरोपाची शहानिशा केली आणि शनिवारी सापळा लावून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उप निरीक्षक जालिंदर मिसाळ यांना रंगेहात अटक केली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा