५० हजारांची लाच घेताना पकडलं, घरात सापडले ३.४६ कोटी

आरे दुग्ध वसाहतीमधील एका रहिवाशाने घराच्या दुरूस्तीचं काम हाती घेतलं होतं. वनक्षेत्र असल्याने यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे.

५० हजारांची लाच घेताना पकडलं, घरात सापडले ३.४६ कोटी
SHARES

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) सोमवारी ५० हजार रुपयांची लाच घेताना आरे दुग्ध वसाहतीचा (aarey colony) मुख्य कार्यकारी अधिकारी नथु राठोड याला अटक केली होती. एसीबी (anti corruption bureau) ने त्याच्या घरी छापा टाकला असता घरात तब्बल ३ कोटी ४६ लाख १० हजार रुपये रोख रक्कम सापडली आहे. 

आरे दुग्ध वसाहतीमधील एका रहिवाशाने घराच्या दुरूस्तीचं काम हाती घेतलं होतं. वनक्षेत्र असल्याने यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे या रहिवाशाने आरे दुग्ध वसाहतीचा मुख्य कार्यकारी अधिकारी नथु राठोड याच्याकडे परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. राठो़ड याने शिपाई अरविंद तिवारी याची भेट घेण्यास सांगितलं. तक्रारदाराने अरविंद तिवारी याची भेट घेतली असता त्याने  राठोड याच्या वतीने ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने १४ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन याबाबतची लेखी तक्रार दिली. 

लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा केली असता यामध्ये तथ्य आढळलं. आरे दूध डेअरी येथील कार्यालयात लावलेल्या सापळ्यात राठोड यांच्या समक्ष ५० हजार रूपये घेताना तिवारी याला पकडण्यात आलं. या प्रकरणी राठोड आणि तिवारी या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राठो़ड याला अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या घरी धाड टाकली. यावेळी राठोड याने भ्रष्टाचार करून कमवलेलं मोठं घबाड हाती लागलं. या धाडीत राठोड याच्या घरातून ३ कोटी ४६ लाख १० हजार इतकी रोख रक्कम हस्तगत केली आहे.



हेही वाचा - 

आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती

COVID 19 रुग्ण शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, अभ्यासातून उघड

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा