रायफल हाताळताना झाला अपघात, नेव्ही कर्मचाऱ्याचा मत्यू

मात्र दोन दिवसापासून त्याची मृत्यूशी सुरूअसलेली झुंज ही संपली. या प्रकरणी पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रायफल हाताळताना झाला अपघात, नेव्ही कर्मचाऱ्याचा मत्यू
SHARES

मुंबईच्या घाटकोपर परिसरात असलेल्या नेव्ही बेसवर रायफल हाताळताना नकळत सुटलेल्या गोळीमुळे घडलेल्या अपघातात  रायपाल सिंह हा जखमी झाला होता. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दोन दिवसापासून त्याची मृत्यूशी सुरूअसलेली झुंज ही संपली. या प्रकरणी पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचाः- प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय? जाणून घ्या ती कशी काम करते?

मुंबईच्या घाटकोपर येथील नेव्ही बेसवर रायपाल यांची नियुक्ती होती. त्या ठिकाणी मटेरियल ऑर्गनायझेशनशी संबंधित १०६ डीएससी पलटणात ते कार्यरत होते. १८ आँक्टोंबर रोजी ते कामावर असताना. सुरक्षेकरता देण्यात आलेली रायफल हाताळताना अचानक त्यांच्या रायफलमधून दोन फायर झाले. या अपघातात रायपाल हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच नेव्हीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मागील दोन दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र अखेर त्यांची झुंज अपयश ठरली. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालावली. रायपाल हे मूळचे अमरगड पंजाबमधील संगरूरचे रहिवाशी आहेत. त्याचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहेत. त्याच्या पश्च्यात त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा