नामांकित कंपन्यांच्या नावे बनावट घड्याळं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कारखान्यातील घड्याळ खरी असल्याचे भासवून विविध बाजारात विक्री करत असे, यामुळे संबंधित कंपन्यांना याचा फटका बसत होता.

नामांकित कंपन्यांच्या नावे बनावट घड्याळं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

नामांकित कंपन्यांच्या बनावट घड्याळांची सोशल मिडियावर विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा ३ च्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आता ही बनावट घड्याळ बनवणाऱ्या कारखान्याच्या मालकाला अटक केली आहे. विकास जैन (३८) असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्या कारखान्यातून तब्बल एक कोटी रुपयांची ५ हजार २८१ बनावट घड्याळे जप्त केली आहेत.

मुंबईच्या मस्जीद बंदर येथील काझी सय्यद स्ट्रीटच्या दुसऱ्या माळ्यावरील खोली क्रमांक २०६ मध्ये ही बनावट घड्याळे बनवण्याचे काम सुरू होते. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक मोहसीन पठान यांच्या पथकाने कारवाई केली होती. पोलिसांनी त्यावेळी तीन जणांना अटक करत, २१ लाखांची ४ हजार १८० बनावट घड्याळ जप्त केली होती. 

या आरोपींच्या चौकशीत ही घड्याळे जैन यांच्या कारखान्यात बनवली जात असल्याचं पुढं आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी पायधुनीतील सारंग स्ट्रीट येथील कारखान्यावर कारवाई केली. कारखान्यातील घड्याळं खरी असल्याचं भासवून विविध बाजारात विक्री केली जात असे. यामुळे संबंधित कंपन्यांना याचा फटका बसत होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारखान्यातून १ कोटी रुपयांची ५ हजार २८१ बनावट घड्याळे जप्त केली आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -

रेल्वेची तिजोरी कॅशिअरनेच लुटली

शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा