बँकेला ३ कोटींचा चुना लावणारा अटकेत

समीरने केलेल्या फसवणुकीमुळे दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथील त्याच्या घराचा ताबा बँकेने घेतला. त्यामुळे त्याचा थांगपत्ता लागणं कठीण होऊन बसलं होतं.

बँकेला ३ कोटींचा चुना लावणारा अटकेत
SHARES

मुंबईतल्या एका नामांकित बँकेला तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या सराईत आरोपीला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. समीर मनोरंजन दास असं या आरोपीचं नाव असून तो २००५ पासून पोलिसांना चकवा देत होता. एका व्यापाऱ्याला देण्यात आलेलं कर्ज त्याने बनावट कागदपत्राद्वारे मिळवलं होतं.


मुंबईतून पळ काढला

बोरीवली (.) येथे राहत असलेल्या संजय शेट्ये यांनी व्यवसायासाठी मुंबईतील नामांकित बँकेकडून साडेतीन कोटी रुपये कर्ज मंजूर केले होते. याची माहिती त्याचा मित्र समीरला होती. शेट्ये यांच्या साधेपणाचा फायदा समीरने घेतला. समीरने शेट्ये यांच्या नावाने बनावट कागदपत्रे आणि कोऱ्या धनादेशवर शेट्ये यांच्या सह्या घेतल्या, त्यांचे पॅन कार्ड व नाव बदली केल्याचे खोटे ‘गॅझेट’ ही समीरने बनविले. त्याच्या आधारे समीरने बॅँकेतून परस्पर रक्कम अन्य खात्यात वर्ग केली होती. शेट्ये यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार दिली. शेट्येने आपली चोरी पकडली गेल्याचे लक्षात आल्यानंतर समीरने मुंबईतून पळ काढला.


पोलिस कोठडी 

समीरने केलेल्या फसवणुकीमुळे दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथील त्याच्या घराचा ताबा बँकेने घेतला. त्यामुळे त्याचा थांगपत्ता लागणं कठीण होऊन बसलं होतं. त्याच वेळी नवी दिल्ली येथील हॉटेल ले तारा मधील रूम नं.२०४ मध्ये तो उतरला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशोर परब यांच्या सूचनेनुसार निरीक्षक ज्ञानदेव केदार, सुजीत कुमार पवार आदींच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्याला अटक केली. त्याला ट्रान्झिस्ट रिमांडवर मुंबईत आणून न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा -

८ महिन्यात मुंबई पोलिसांनी ६ हजार वादग्रस्त पोस्ट सोशल मिडियावरून हटवल्या

दादा, पवार, नाना यांच्यावरही वाहतूक विभाग करणार कारवाई




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा