दादा, पवार, नाना यांच्यावरही वाहतूक विभाग करणार कारवाई

कायद्यानं अशा प्रकारच्या फॅन्सी नंबर प्लेट बसवणं गुन्हा आहे. मात्र वाहन धारकांकडून नियमांची पायमल्ली केली जाते.

दादा, पवार, नाना यांच्यावरही वाहतूक विभाग करणार कारवाई
SHARES

तुमच्या गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावली आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी आता कायद्यानुसार नसणाऱ्या आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या चालकांवर धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी २२७२ चालकांवर कारवाई केली आहे. मोटार वाहन कायदा ५१ अंतर्गत ही कारवाई केली जात असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.


नियमांची पायमल्ली

मुंबईत अनेक वाहन चालक नवी गाडी घेतली की आपल्या आवडत्या नंबरची मागणी करून, नंबर प्लेटवर चित्र-विचित्र प्रकारे आकडे लिहितात. यासाठी वाहनधारक वाटेल तितकी रक्कम मोजायला तयार असतात. मात्र कायद्यानं अशा प्रकारच्या फॅन्सी नंबर प्लेट बसवणं गुन्हा आहे. मात्र वाहन धारकांकडून नियमांची पायमल्ली केली जाते. या फॅन्सी नंबर प्लेटमध्ये अनेक आकडे प्रसिद्ध आहेत.  ४१४१ (दादा), २१२४ (शरद), ९१९१(बाबा), ४९१२(पवार), ७१७१ (नाना), ८०५५ (बाॅस) अशा प्रकारे इंग्रजी किंवा मराठी अक्षरे मोल्ड करून या नंबर प्लेटवर रेखाटली जात आहेत. मात्र, आता अशा वाहन धारकांना चाप बसणार आहे. कारण मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने फॅन्सी नंबर प्लेट वाहन धारकांविरोधात धडक मोहीम सुरु करणार आहे.


नंबर प्लेटला विशिष्ठ आकार

मुंबईतल्या अनेक सिग्नलहून या फॅन्सी नंबरप्लेट लावण्यात आलेल्या गाड्या येत जात असतात. या वाहनांवर आता सीसीटीव्हीद्वारे ई-चलन कारवाई केली जात आहे. अनेक वाहनांच्या नंबरप्लेट या नियमाप्रमाणे नाहीत. म्हणजेच काहींनी नंबर प्लेटवरील अक्षरं ही जरी इंग्रजी असली. तरी त्यांनी नंबर प्लेटला विशिष्ठ आकार दिलेला आहे. तर काहींनी छोट्या नंबर प्लेट लावल्यामुळे त्यावरील नंबर अस्पष्ठ दिसतात. त्यामुळेच वाहनांवरील नंबर प्लेट ही वाहतूक कायद्यानुसारच बसवण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.


नंबर प्लेटबाबतचे नियम

) कार किंवा बाईकवरील नंबर प्लेट्सच्या संख्यांचा आकार कमीत कमी दोन इंच असणं आवश्यक आहे.

) कार किंवा बाईकवर लावलेल्या नंबर प्लेटवरील क्रमांक हे वाचण्याजोगे असावेत. यासाठी फॅन्सी नंबर प्लेट लावणं हे नियमबाह्य ठरेल.

) कार किंवा बाईकवरचे नंबर प्लेटवरील सर्व क्रमांक हे एकसारख्या आकाराचे असावेत.

) तुमची गाडी चोरीला गेली असल्यास जुन्या गाडीचा नंबर नवीन गाडीच्या नंबर प्लेटवर लावू शकता. यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं नवीन सर्क्युलर काढून हे आदेश दिले आहेत.

) नंबर प्लेटवर कोणत्याही प्रकारची सांकेतिक चिन्हे किंवा तत्सम गोष्टी लावणं नियमांच्या विरोधात असेल.



हेही वाचा -

अल्पवयीन मुलीला आईनेच ढकललं वेश्या व्यवसायात

पोलिस दिदी करणार 'विद्यार्थ्यांचं संरक्षण'




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा